Event single

Project Hope 2016 : Kolhapur

प्रोजेक्ट होप च्या तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर येथील पन्हाळ्यापासून सुमारे 20 किलोमीटर आत असलेल्या धोंडेवाडी व कासार वाडी या गावातील शाळांना शैक्षणिक साहित्य व ई लर्निंग संच प्रदान करण्यात आले. त्या नंतर संगमेश्वर मधील धामापूर या गावातील जिल्हापरिषद शाळेला त्यांच्या विनंतीनुसार ई लर्निंग संच देण्यात आला. त्याच बरोबर चिपळूण येथील कोळकेवाडी शाळेला ई लर्निंग यंत्रणा व दापोली मधील आगारवायंगणी येथील शाळेला ई लर्निंग संचा बरोबर गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. त्या नंतर रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथील मेंदडीकोंड या शाळेला ई लर्निंग संच देण्यात आला. अजून कोल्हापूर व रत्नागिरी मधील काही विभागातील गरजू विध्यार्थ्यांना शैक्षिणक साहित्य आमचे कोल्हापूर व रत्नागिरी टीमचे स्वयंसेवक येत्या काही दिवसात देण्याचे काम करतील